शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (07:43 IST)

छगन भुजबळ, शिवसेना अन् मशाल!

chagan bhujbal
दोन्ही गटांनी बंडखोरी झाल्यापासून आम्हीच खरी शिवसेना असा दावा केला आहे. या दाव्यावर आता निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय घ्यायचा आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अंधेरीची पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना नक्की कोणाची याचा निर्णय घेणे आवश्यक होते. पण निवडणूक आयोगाचा अद्याप निर्णय न झाल्याने, या निवडणुकीपुरते पक्षाचे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरते गोठवण्यात आले. आता ठाकरे गट 'शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)' या नावाने तर शिंदे गट 'बाळासाहेबांची शिवसेना' या नावाने निवडणूक लढवू शकणार आहे. त्यासोबतच ठाकरे गटाला नवे चिन्ह म्हणून 'धगधगती मशाल' देण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे व जल्लोषाचे वातावरण आहे. या आधीही शिवसेनेने मशाल या चिन्हावर निवडणूक लढवलेली आहे. मात्र योगायोगाने त्यावेळी त्यांचे उमेदवार होते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले छगन भुजबळ! नक्की केव्हाची आहे ही घटना, कोणता होता तो मतदार संघ... जाणून घेऊया
 
छगन भुजबळ, शिवसेना अन् मशाल!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९७२ साली माझगांव विभागातून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी छगन भुजबळांना उभे केले. जनतेने त्या निवडणूकत त्यांनी निवडूनही दिले. १९७८ साली महापालिकेची दुसरी निवडणूक झाली. पहिल्या पांच वर्षाच्या माझ्या कामाची पोचपावती म्हणून, मतदारांनी पुन्हा एकदा भुजबळांना निवडून दिले. अनेक रथी-महारथी विरोधकांच्या अनामत रकमा जप्त झाल्या, इतक्या मोठ्या प्रमाणात भुजबळांना यश मिळाले. माझगांवच्या या निवडणुकांमधील यशानंतर त्यांना १९८५ साली विधानसभेकरता माझगांव विभागातून आमदारकीचे तिकीट देण्यात आले. त्यांच्यासाठी विधासभा लढवण्याची ही पहिलीच वेळ होती. १९८५ साली माझंगाव विधानसभा मतदार संघातून छगन भुजबळ हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते आणि तेव्हा त्यांचे चिन्ह होते मशाल. योगायोगाने आता हेच चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या गटालाही मिळाले आहे, पण छगन भुजबळ मात्र या पक्षात नाहीत.
 
छगन भुजबळ यांनी आपल्या आमदारकीच्या प्रचारासाठी एक पुस्तक तयार केले होते. त्यात त्यांनी अनेक गोष्टी नमूद केल्या होत्या. ते म्हणतात, "या कालखंडामध्ये आपल्या भागातील नागरिकांना विविध सुविधा देण्याचा मी यशस्वी प्रयत्न केला.

Edited by : Ratnadeep Ranshoor