शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (23:00 IST)

चिकन बिर्याणीने घेतला तरुणाचा बळी

चिकन बिर्याणी हे नाव ऐकूनच तोंडाला पाणी येत. चिकन बिर्याणी ही सहज कोणालाही आवडते. पण या बिर्याणीने एकाचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे. ही घटना औरंगाबादच्या वाळूज मध्ये घडली आहे. या बिर्याणीमुळे 25 वर्षीय सचिन नावाच्या तरुणाने आपला जीव गमावला आहे. 
 
झाले असे की सचिन ने आपल्या आणि आपल्या भावासाठी बाजारातून बिर्याणी खाण्यासाठी आणली होती. दोघे भाऊ बिर्याणी खाण्यासाठी बसले. खाऊन झाल्यावर त्यांच्या पोटात दुखू लागले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असता उपचारादरम्यान सचिनची तब्बेत खालावली आणि त्याचा मृत्यू झाला.
डॉक्टरांनी विषबाधा होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. 
 
डॉक्टर म्हणाले की शिळी बिर्याणी खाल्ल्यामुळे पोटात इन्फेक्शन झाले असावे. त्यामुळे लिव्हरवर परिणाम होऊन इन्फेक्शन मुळे रक्त पातळ होऊन अंतर्गत  रक्तस्त्राव झाला. आणि त्यामुळे विषबाधा होऊन त्याचा मृत्यू झाला. 
 
बऱ्याचदा काही हॉटेल वाले चिकन बिर्याणीत शिळे आणि खराब झालेले मांस वापरतात आणि बिर्याणी स्वस्तात विकतात. त्यामुळे हे अन्न देखील विषारी होत. पण पैशांसाठी हे लोकांच्या जीवाशी खेळतात. हे सचिन सोबत घडले. सचिन ने कुठून ही विषारी बिर्याणी आणली होती हे कोणालाच माहित नसल्यामुळे बिर्याणीवाल्याचा शोध कसा लावावा हे कोडंच आहे. पोलिसांनी त्या बिर्याणीवाल्याच्या शोध घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल कारवाई करावी असे सचिनच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.