रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 जानेवारी 2023 (08:42 IST)

माझ्याविरोधात कट करणाऱ्यांची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार

abdul sattar
इगतपुरीत घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे सर्व शासकीय यंत्रणा आणि स्वत: मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल झाले. मी कुणाचंही नाव घेतलं नाही आणि कुणाला काहीही बोललो सुद्धा नाही, असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे  उद्घाटन झाले. यावेळी अब्दुल सत्तार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, संजय शिरसाट हे माझे चांगले मित्र आहे. मला कुणाचंही नाव घ्यायचं नाही. जे आले त्यांचं धन्यवाद आणि जे नाही आले त्यांचंही धन्यवाद…शेवटी हे कृषी प्रदर्शन आहे. हे कोणत्या आमदार, खासदार, पक्ष आणि जाती-धर्माचा नाही. माझ्याविरोधात कट करणाऱ्यांची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. त्यांच्याकडे सर्व यंत्रणा उपलब्ध आहेत. त्यामुळे याचं उत्तर मुख्यमंत्रीचं देतील. माझ्यासोबत काही घटना घडल्यानंतर त्या चार ते पाच मिनिटांत बाहेर येतात. त्यामुळे एक मनात शंका निर्माण झाली होती. ती शंका मी लोकांसमोर मांडली, असं अब्दुल सत्तार म्हणाले.
 
काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?
 
माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात कट रचत असल्याचा गंभीर आरोप सत्तार यांनी केला आहे. मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. यात काही माझ्या पक्षातील असू शकतात तर काही माझे हितचिंतक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरात होणारी चर्चा बाहेर येत आहे. त्यामुळे आमच्यातील कुणीतरी बाहेर बातम्या पुरवत असल्याचा आरोप सत्तार यांनी केला आहे. तर ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्याकडून हे सर्व सुरु आहे, असा गौप्यस्फोट अब्दुल सत्तार यांनी केला.