शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By औरंगाबाद|
Last Modified: सोमवार, 2 जानेवारी 2023 (07:48 IST)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन

cm shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आज उद्घाटन झाले.
या प्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि कृषी आयुक्त सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.
द्घाटनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रदर्शनातील विविध कृषी दालनांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतीतील नवतंत्रज्ञान, नवे प्रयोग याविषयी शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली तसेच शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या नव्या प्रयोगांचे कौतुकही केले.
प्रदर्शनाची वैशिष्ट्ये
600 पेक्षा जास्त स्टॉल्स
99 विविध प्रात्यक्षिके
आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग
शासनाच्या विविध योजनांचे सादरीकरण
यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा
32 विविध चर्चासत्रे
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे राज्यस्तरीय उद्घाटन
 विशेष सहभाग
 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला
महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग महामंडळ, मुंबई

Edited by : Ratnadeep Ranshoor