1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 26 मे 2024 (13:51 IST)

इयत्ता 10 वी चा निकाल उद्या जाहीर होणार, विद्यार्थी असे पाहू शकतील

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता 10 वीचा निकाल उद्या सोमवारी 27 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. 
 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडल कडून मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वीचा निकाल 27 मे रोजी जाहीर केल्याची घोषणा राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे केली. यंदा इयत्ता 10 वी च्या परिकसेसाठी 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 

विद्यार्थी खालील दिलेल्या संकेत स्थळांवर निकाल पाहू शकतील.यासाठी विद्यार्थ्यांना या संकेत स्थळांवर जाऊन परीक्षा बैठक क्रमांक आणि आईचे नाव प्रविष्ट करून निकाल पाहता येईल. 

http://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
 
निकाल लागल्यानन्तर मंगळावर 28 मे रोजी गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल. अर्ज करण्याची मुदत मंगळवार 11 जून पर्यंत असेल. यासाठी विद्यार्थ्यांना http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे.
 
Edited by - Priya Dixit