मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 2 ऑगस्ट 2022 (09:07 IST)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी महिन्याभरात अनेकदा दिल्लीची वारी केली आहे. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत स्पष्टता नाही. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अनिश्चितता असताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (१ ऑगस्ट) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली.
 
मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (१ ऑगस्ट) आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांची मुंबईत आरएसएसच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी मोहन भागवत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पुस्तकरुपी भेट दिली. शिंदे-फडणवीस आणि मोहन भागवात यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.