1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 18 मे 2020 (17:46 IST)

शपथविधीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आमदारकीची शपथ घेतली. विधीमंडळात साधेपणाने हा शपथविधी पार पडला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत बिनविरोध निवडून आलेल्या इतर आठ उमेदवारांनाही आमदारकीची शपथ घेतली. शपथविधीनंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. 
 
यावेळी राज्यपालांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल अभिनंदन केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, राजशिष्टाचार व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे देखील उपस्थित होते.
 
विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीमध्ये १३ पैकी ४ उमेदवारांनी माघार घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व नऊ अधिकृत उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली होती.
 
शपथविधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.