मंगळवार, 21 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (10:35 IST)

उल्हासनगरमध्ये रिक्षात विनयभंग, तरुणीने मारली उडी

धावत्या रिक्षात एका तरुणाने कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने रिक्षातून उडी मारल्याची घटना उल्हासनगर येथे घडली.
 
पीडिता शनिवारी नऊच्या सुमारास कॉलेज जाण्यासाठी शेअर रिक्षात बसली. त्यात आधीच मास्क घालून तरुण बसला होता. आरोपी तरुणाने तिच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तरुणीने सांगूनही रिक्षाचालकाने रिक्षा थांबवली नाही तेव्हा तरुणीने सुटका करण्यासाठी धावत्या रिक्षातून उडी मारली. तरी तरुणाने देखील उडी मारत छेड काढणे सुरु ठेवले. नंतर तरुणीने आरडाओरड सुरु केल्यानंतर नागरिकांनी तिच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यावेळी त्या तरुणाने रिक्षात बसून पळ काढला.
 
तरुणीने पोलीस स्थानकात जाऊन तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.