शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 फेब्रुवारी 2022 (12:57 IST)

गडकरींच्या घराबाहेर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा

नागपूर : नागपुरात काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर भाजप आणि काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाल्याचं पहायला मिळत आहे. कोरोना पसरवण्यास काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी संसदेत केला होता. त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून 'मोदी माफी मागा' आंदोलन करण्यात येत आहे.
 
मोदींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराबाहेर आंदोलन केले. हे कळताच चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी देखील आंदोलनस्थळाकडे धाव घेतली. भाजप कार्यकर्ते देखील काँग्रेस कार्यकर्त्याना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी गडकरींच्या घराबाहेर जमा झाले.
 
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या घरासमोरील सुरक्षा पोलिसांनी वाढवली आहे. तसेच काँग्रेसकडून राज्यभर याचा निषेध केला जात आहे.