सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जून 2024 (18:44 IST)

NEET परीक्षेतील हेराफेरी विरोधात नागपुरात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन

 congress protest
NEET वैद्यकीय परीक्षेतील गैरप्रकारांच्या विरोधात देशात निर्दशने सुरु आहे. NEET वैद्यकीय परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात महाराष्ट्र काँग्रेसने शुक्रवारी संपूर्ण राज्यात निदर्शने केली. नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी चिखलफेक आंदोलनांतर्गत निदर्शनेही केली.
 
शुक्रवारी नागपुरातील व्हरायटी चौकात शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर चिखलफेक केली. तसेच पुतळ्याजवळील मडके फोडून निषेध व्यक्त केला.
 
काँग्रेस कार्यकर्त्यांनी चिखलफेक आंदोलन करत काही वेळ रास्ता अडवून आंदोलनात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला.या मुळे वाहतूक खोळंबली आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरी जावे लागले. 
पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बेरिकेड्स लावून रोखण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्त्यांनी  बेरिकेड्स तोडून काही काळ रस्ता रोको केले ते रस्त्याच्या मधोमध बसून राहिले. सरकार तरुणांच्या भविष्याशी खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला. 
 
 काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या कार्यकाळात अनेक पेपर फुटले आहेत. कोणतेही पेपर वेळेवर घेतले जात नाहीत आणि घेतले जात असले तरी पेपर लीक होत आहेत. सरकारला तरुणांच्या भवितव्याशी काहीही देणेघेणे नाही.
 
तसेच देशातील तरुणांना रोजगार मिळत नसल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकार जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. लोकांचा सरकारवरील विश्वास उडाला आहे. स्पर्धा परीक्षा वेळेवर होत नाहीत. ही परीक्षा घेतल्यास पेपरफुटीचा संशय आहे. रस्त्यावरील आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. 

Edited by - Priya Dixit