शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जून 2022 (08:59 IST)

महाराष्ट्रात मुंबईसह राज्यात वाढतोय कोरोना!

coronavirus
महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी सध्या कोरोना रुग्णांची (corona) संख्या वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासांत कोरोना आजाराचे 2 हजार 366 नवे रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासांत मुंबईत 2 तर उर्वरीत राज्यात कोरोनाचा 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
मुंबईत कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन फॉर्मच्या BA.4 सब-व्हेरियंटचे तीन आणि BA.5 सब-व्हेरियंटचे एक प्रकरण नोंदवले गेले आहे. सर्व रुग्ण या आजारातून बरे झाल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या मते, BA.4 आणि BA.5 हे कोरोनाच्या अतिसंसर्गजन्य ओमिक्रॉन स्वरूपाचे सब व्हेरियंट आहेत.
 
आरोग्य विभागाने सांगितले की, महानगरपालिका संचालित कस्तुरबा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेच्या अहवालात महानगरातील तीन रुग्णांमध्ये BA.4 सब व्हेरियंट आणि एका रुग्णामध्ये BA.5 व्हेरियंट असल्याची पुष्टी झाली आहे. या चार रुग्णांमध्ये दोन मुली आणि दोन पुरुष आहेत. मुलींचे वय 11 वर्षे आणि पुरुषांचे वय 40 ते 60 वर्षे आहे. विभागाने सांगितले की, सर्व रुग्णांनी होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण केला आहे आणि ते आजारातून बरे झाले आहेत.
 
तर राज्यात आजपर्यंत एकूण ७७,५५,१८३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. राज्यात आज ३ करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्के एवढा आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.८७ टक्के एवढे झाले आहे.