बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑगस्ट 2023 (11:14 IST)

प्रेम विवाहापूर्वी पित्याकडून लेकीची हत्या

murder
Daughter killed by father before love marriageनांदेडमध्ये  जन्मदात्या पित्यानेच लेकीची हत्या केल्याची खळबळजन घटनाघडली आहे. मृत मुलगी अल्पवयीन आहे. तिचे एका तरुणासह प्रेम संबध होते. मात्र, पित्याला ते मान्य नव्हते. मुलगी प्रेम विवाहाचा हट्ट करत होती. यामुळे या अल्पवयीन मुलीची वडिलांनी कोयत्याने वार करुन हत्या केली. मात्र, आपला गुन्हा लवपवण्यासाठी या पित्याने जे केल ते पाहून पोलिसांना देखील मोठा धक्का बसला. 
 
काय घडलं नेमकं? 
प्रेमविवाहाचा हट्ट करणाऱ्या स्वतःच्या मुलीवर कोयत्याने वार करून पित्याने तिची हत्या केली. त्यांनतर मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव करून तिचा अंत्यविधीही करून टाकला. नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील ही घटना पोलिसानी शिताफीने उघडकीस आणली. मुक्रमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनू तांडा येथे आठ दिवसापूर्वी ही घटना घडली होती.
 
हत्या करुन मुलीच्या मृतदेहावर अत्यसंस्कार केलेमनू तांडा येथील सोळा वर्षीय मुलीचे आपल्याच नात्यातील एका तरुणावर प्रेम होते. मृत मुलगी इयत्ता दहावीत शिकत होती. त्यांच्या प्रेमाला वडील अण्णाराव राठोड यांचा विरोध होता. पण मुलीने त्याच मुलाशी लग्नाचा अट्टाहास केला. तेंव्हा रागाच्या भरात अण्णाराव राठोड याने मुलीवर कोयत्याने वार केले. डोक्यावर गंभीर जखम झाल्याने तिचा मृत्यू झाला.