शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जुलै 2023 (20:47 IST)

Nashik News रुग्णालयातुन आईचा डिस्चार्ज घेण्यासाठी निघालेल्या मुलाचा अपघातात मृत्यू

accident
नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातुन आईला घेण्यासाठी येणाऱ्या मुलाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. नाशिकच्या द्वारका परिसरातील ट्रॅक्टर हाऊस येथील उडानपुलावर हा अपघात झालाय. आकाश कैलास कोतकर असे मयत तरुणाचे नाव आहे.
 
गेल्या चार दिवसांपासून आकाशची आई शासकीय जिल्हा रुग्णालय उपचार घेत आहे. आज त्याच्या आईला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता. आईला घरी घेऊन जाण्यासाठी आकाश पिंपळगाव येथून नाशिकला त्याच्या मित्रांसोबत दुचाकीवर निघाला होता.
 
द्वारका येथील उडापुलावर आकाश आला. याठिकाणी बंद कंटेनर उभा होता. आकाश याची दुचाकी उभ्या असलेल्या कंटेनरला माग च्या बाजूस जाऊन आदळली. यात दोघंही गंभीर जखमी झाले होते. दोघांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी आकाश याला मृत घोषित केल असून एक गंभीर जखमी आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत