शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 एप्रिल 2023 (11:53 IST)

वाहनाखाली झोपलेल्या दोन चिमुकल्यांचा मृत्यू

accident
अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यात तळणी शिवारातील एका जिनींग प्रेसमध्ये काम करणाऱ्या कामगाराच्या वाहनाखाली झोपलेल्या दोन चिमुकल्यांचा वाहनाने चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या अपघातात दोन्ही चिमुकल्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जिनींग प्रेसमध्ये काम करणाऱ्या एका कामगारांचे दोन मुलं उभी असलेल्या वाहनाखाली झोपलेले असता वाहन चालकाच्या लक्षात आले नाही आणि त्याने गाडी सुरु केली त्यात वाहनाखाली झोपलेल्या दोन चिमुकल्यांचा चिरडून मृत्यू झाला आहे. अपघातांनंतर संतप्त जमवाने आकोश केला आणि आम्हाला आमची मुलं परत द्या अशी घोषणा केली. घटनास्थळी पोलिसांनी पोहोचून संतप्त जमावाला समजविण्याचा प्रयत्न केला. हा कामगार मध्यप्रदेशातील असल्याचे समजले.   
Edited By- Priya Dixit