शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 फेब्रुवारी 2023 (20:56 IST)

जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

jitendra awhad
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भातील एक कथित ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये बोलणारी व्यक्ती जितेंद्र आव्हाड, त्यांची मुलगी आणि जावयाला मारण्याचा कट आखत असल्याचे स्वतः आव्हाड यांनी सांगितले. जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या धक्कादायक क्लिपनंतर देखील पोलिसांत तक्रार न दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
मुंबईचा गँगवार जवळून बघितलेला मी माणूस, हा बाबाजी म्हणजे सुभाष सिंग ठाकूर असून हा जे जे हत्याकांडातला एक आरोपी असल्याचं स्पष्टीकरणं जितेंद्र आव्हाड यांनी दिलं. मला सकाळी माझ्या एका मित्राने ही ऑडिओ क्लिप आणून दिली. त्यामध्ये काही धक्कादायक बाबी आहेत. सदर क्लिपमध्ये बोलणाऱ्या व्यक्तिचे नाव महेश आहे. माझ्या मुलीपर्यंत किंवा जावयापर्यंत? पण माझ्या कुटुंबियांवर गोळ्या झाडणारा माणूस अजून या जगात पैदा व्हायचा आहे. त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे 40 लाख दिवसाला जमा करतो, 20 लाख वाटतो आणि सारखं त्याने बाबाजी आणि शूटर्सचं नाव घेतलं असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
 
स्पेनमध्ये मारेकरी तयार ठेवल्याचे रिकॉर्डींगमध्ये उल्लेख असून माझ्या अंदाजाने जी माहिती मुंबईची आहे. मुंबईचा गँगवार जवळून बघितलेला मी माणूस आहे. हा बाबाजी म्हणजे सुभाष सिंग ठाकूर आहे. जे जे हत्याकांडातला एक आरोपी होता, असंही आव्हाड म्हणाले.
 
मी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करणार नाही. कारण तक्रार दाखल करुनही काही होत नाही. फक्त चौकशीच्या नावांवर पोलीस काहीही करत नाही आणि आरोपी आपल्यासमोर फिरत असतो. मग तक्रार दाखल करुन तरी काय होणार?, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor