रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 नोव्हेंबर 2022 (23:27 IST)

दीपाली सय्यद उद्या एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार

Dipali Sayyed
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का मिळणार असून ठाकरे गटाच्या नेत्या अभिनेत्री दीपाली सय्यद उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहे. ही माहिती खुद्द दीपाली सय्यद यांनी दिली आहे. दिपालीने सांगितल्यानुसार उद्या दुपारी एक वाजता ठाण्यात एका कार्यक्रमात शिंदे गटात प्रवेश करणार आहे. एकनाथ शिंदेनी शिवसेनेत मला आणलं मी शिवसेनेत आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहे. 
मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं असे प्रत्येकाला वाटते . काम प्रत्येकालाच करायचं आहे. त्या -त्या पद्धतीने काम चालले आहे. 

ठाकरे आणि शिंदे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न प्रत्येकानी केला पण हा प्रयत्न अयशस्वी ठरला. देवाला प्रार्थना आहे की त्यांनी एकत्र यावे.अशी आशा करतो.   
 
 
Edited  By - Priya Dixit