रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 डिसेंबर 2021 (14:58 IST)

जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर अभाविप कार्यकर्त्याची निदर्शन

म्हाडाच्या परीक्षा रद्द झाल्याने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर अभाविप कार्यकर्त्यानी निदर्शनं करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी यावेळी मोठा बंदोबस्त तैनात केल्याने कार्यकर्ते घराजवळ पोहचू शकले नाही. मात्र निदर्शने आणि घोषणाबाजी सुरू असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी त्याठिकाणी आल्यानं मोठा तणाव निर्माण झाला होता. 
 
पोलिसांनी यावेळी आंदोलन करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर ठाण्यात वर्तकनगर पोलीस ठाण्यात कारवाई केली. दरम्यान अभाविपच्या आंदोलकांना जशास तसं उत्तर दिलंय. आंदोलनकर्त्यांनी पुन्हा पाऊल उचललं तर राष्ट्रवादीकडून त्यांच्या आरेला कारे उत्तर देऊ असा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिलाय.