शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 सप्टेंबर 2017 (08:24 IST)

कुत्र्याच्या नैसर्गिक विधीमुळे न्यायालयाने केला 2 हजारांचा दंड

जळगाव न्यायालयाने दुसऱ्याच्या घरासमोर लघुशंका आणि विष्ठा करणाऱ्या कुत्र्याचा मालकाला  2 हजारांचा दंड ठोठावला आहे. जळगावच्या आदर्श नगरमध्ये राहणाऱ्या शर्मा परिवारानं मोठ्या आवडीनं कुत्रा पाळला. शर्मा त्यांच्या कुत्र्याला नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर सोडत असत. त्यांचा कुत्रा एका वृद्ध महिलेच्या घरासमोर लघुशंका आणि विष्ठा करायचा. त्यामुळं त्या महिलेनं शर्मांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायाधीशांनी शर्मा यांना चपराक लगावत, 2 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे कुत्र्याला नैसर्गिक विधीसाठी मोकळे सोडणाऱ्या कुत्रा मालकांचे चांगलेच धाबे आता दणाणले आहे. सार्वजनिक जागी कुत्र्याच्या नैसर्गिक विधीसाठी न्यायालयाने दंड केल्याची ही पहिलीच घटना  आहे.