शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (09:17 IST)

पालघर आणि नाशिक मध्ये पहाटे भूकंपाचे धक्के

earthquake
23 नोव्हेंबर रोजी राज्यातील पालघर आणि नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नाशिक ला रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.6 इतकी मोजण्यात  आली .नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, पहाटे 04.04 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. तर पालघर मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले रिश्टर स्केलवर तीव्रता 3.4 इतकी मोजण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याची पुष्टी केलेली नाही.
 
बुधवारी पहाटे महाराष्ट्रातील नाशिक आणि पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने कोणतीही जण धन हानी झाली नाही. नाशिक का पहाटे 4वाजता भूकंपाचे धक्के5 किमी खोलीवर जमिनीखाली जाणवले. तर पालघरातील डहाणूच्या तलासरी तालुक्यात पहाटे 4वाजून 5 मिनिटावर भूकंपाचे धक्के जाणवले. 

Edited By- Priya Dixit