रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 2 जानेवारी 2022 (10:34 IST)

एकनाथ शिंदे सक्षम त्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी टाकावी, दानवेंचा सल्ला

उद्धव ठाकरे यांचं आजारपण आणि मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी यावर आणखी एका भाजप नेत्यांनी भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे सक्षम आहेत, त्यांना शिवसेनेनं मुख्यमंत्री करावं असा सल्ला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरे आजारी आहेत. पण राज्याचा कारभार चालवायला कुणीतरी मुखिया पाहिजे. एकनाथ शिंदे हे सक्षम आहेत. त्यामुळं त्यांना मुख्यमंत्री करायला काय हरकत आहे, असं दानवे यांनी म्हटलं आहे.
शिवसेनाच नव्हे तर तुम्ही इतर कुणालाही मुख्यमंत्री पद द्या. राष्ट्रवादीला द्या, अजित पवारांना द्या पण कोणाला तरी हे पद द्यावं असं ते म्हणाले आहेत.
नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. त्यावरुनही विरोधकांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती.