रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (21:54 IST)

सुमारे २० लाखाची वीजचोरी उघड, उरण पोलिसांत गुन्हा दाखल

महावितरणच्या भरारी पथकाने पनवेल शहर विभागातील उरण येथे एका आईस अँड चिलिंग कंपनीत १,३६,३४१ युनिटची २० लाख ६० हजार २२० रुपयांची वीजचोरी उघडकीस केली आहे . या प्रकरणी उरण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. २३ ऑगस्ट २०२१ रोजी महावितरण वाशीच्या भरारी पथकाने मुख्यालयातील सुरक्षा व अंमलबजावणी विभागच्या व मुख्य अभियंता भांडूप परिमंडल सुरेश गणेशकर यांच्या निर्देशानुसार उरण येथील ‘श्री स्वामी समर्थ आईस अँड चिलिंग या बर्फ बनविण्याचा कंपनीत वाशीच्या भरारी पथकाने धाड टाकली व वीज मीटरची तपासणी केली. मीटरची सविस्तर तपासणी केली असता मीटरमध्ये काही फेरफार केले असल्याचे आढळून आले. या कंपनीला महावितरणने ६५ एचपीचा विद्युत भार मंजूर करून दिला होता. परंतु, सदर मीटरची अक्युचेकद्वारे तपासणी केली असता मीटर मंदगतीने चालत असल्याचे निदर्शनास आले. मीटर उघडल्यावर, रिमोट सर्किटच्या सहाय्याने वीजचोरी केली आहे असे निष्पन्न झाले.
 
रिमोटद्वारे ग्राहक मीटरमध्ये वापरात असलेल्या विजेचे व्यवस्थित मापन होऊ देत नसल्याचे उघड झाले . फेरफार करून ग्राहकाने १,३६,३४१ ऊनिटची रु. २०,६०,२२० वीजचोरी केली आहे असे आढळून आले. ग्राहकाला वापरलेल्या विजेचे देयक सोबत दंडाची रक्कम असे एकूण बिलाची आकारणी करून देण्यात आले होते. ग्राहकाने ही रक्कम न भरल्यामुळे सदर ग्राहक, गौतम सखाराम तनफरे यांच्या विरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.