मराठी मीडियमला इंग्लिश प्रश्नपत्रिका !
सध्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बारावीची परीक्षा सुरू आहे. परंतु यंदाच्या परीक्षेत बोर्डाकडून काही न काही गोंधळ होत असल्याचे दिसून येत आहे. अंबेजोगाई येथे घडलेल्या एका प्रकारात बारावीचा कॅम्पुटर टेक्निक विषयाचा पेपर द्यायला आलेल्या मराठी मिडीयमच्या विद्यार्थ्यांना चक्क इंग्लिश मिडीयमची प्रश्नपत्रिका आली. यामुळे एकच गोंधळ उडाला.
मिळालेल्या माहितीनुसार 27 फेब्रुवारी रोजी बारावीचा कॅम्पुटर टेक्निक नावाचा पेपर होता. त्यानुसार विद्यार्थी सेंटरवर परीक्षा घायला आले. मात्र संबंधित घडलेला प्रकार लक्षात येताच सेंटरवर सेंटर चालकांचा आणि स्टाफचाही गोंधळ उडाला.
अशात शेवटी सेंटर चालकांना इंग्लिश मिडीयमचा पेपर मराठीत भाषांत करावा लागलं. यानंतर विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यास देण्यात आला.
यापूर्वी 21 फेब्रुवारीला इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरमध्ये इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्ना ऐवजी उत्तर छापून आले होते. या सर्व घडत असलेल्या घटनांमुळे बोर्डाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.