रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जानेवारी 2022 (21:10 IST)

नियम तोडणाऱ्या आस्थापनाएक दिवस नाहीतर कोरोना संपेपर्यंत बंद करू

नाशिक मध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून कोरोना नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नियम तोडणाऱ्या आस्थापना एक दिवस नाही तर कोरोना संपेपर्यंत बंद होऊ शकतात, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे.
 
आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा रुग्णसंख्या वाढत आहेत. एवढे निर्बंध लावूनही आस्थापना नियम पाळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यामुळे नियम तोडणाऱ्या आस्थापना एक दिवस नाही तर कोरोना संपेपर्यंत बंद होऊ शकतात, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे.
 
ते पुढे म्हणाले की, सात दिवसात रुग्णांचे आकडे डबल झाले असून पॉझिटिव्हीटी रेट ४० च्या वर गेला आहे. त्यामुळे येत्या दिवसांत लसीकरण, कोरोना टेस्टिंग दुपटीने करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
 
दरम्यान दुसरा डोस अद्यापही अनेक नागरिकांचा बाकी असून दुसरा डोस घेणं आवश्यक आहे. यामध्ये ज्यांनी डोस घेतले नाही त्यांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पुन्हा ‘नो वॅक्सिंन नो एन्ट्री’ची कारवाई सुरू करावी लागेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.