बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जून 2022 (14:45 IST)

एका बाकावर तीन विद्यार्थ्यांना बसवून परीक्षा

uday samant
औरंगाबाद- एका बाकावर तीन विद्यार्थ्यांना बसवून परीक्षा घेण्याची घटना घडली आहे परंतू हे फार चुकीचं असून या संदर्भात सविस्तर चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले.
 
औरंगाबादमधील पदवी-पदव्युत्तर परीक्षेतील घडलेल्या गोंधळाप्रकरणी पेपर नव्याने घ्या, असे आदेश सामंत यांनी दिला आहे. तसेच​​​ दोषींवर कारवाई करणाचा इशाराही त्यांनी दिला आहे. पदवी परीक्षेतील ही फार मोठी चूक असून ही चूक विद्यापीठाकडून झाली की, महाविद्यालयाकडून याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणाचा तपास करुन याचा अहवाल 24 तासांमध्ये आला पाहिजे, असा आदेश सामंत यांनी विद्यापीठ सहसंचालकांना दिले आहेत. 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेच्या पहिल्याच दिवशी गोंधळ पाहायला मिळाला जेथे परीक्षा केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी आल्याने एका बाकावर तीन-तीन विद्यार्थ्यांना बसवल्याचा अजब प्रकार पाहायला मिळाला.