मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 एप्रिल 2023 (08:03 IST)

अखेर आठ तासानंतर ‘केएमटी’चा संप मागे

कोल्हापूर : सातवा वेतन आयोगासह इतर मागण्यासाठी केएमटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी संप पुकारला होता. दिवसभर शहरातील बस सेवा बंद राहिली. सायंकाळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. यानंतर संप मागे घेण्यात आला. आज, शनिवारी बस सेवा नियमित सुरू राहणार आहे.
 
सातवा वेतन आयोगाचा प्रस्ताव 30 एप्रिलपर्यंत राज्य शासनाकडे पाठविणे, 15 दिवसांत रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव तयार करणे, 25 टक्के महागाई भत्ता एप्रिल पेड इन मे महिन्यांत देणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना रोजंदारीमध्ये वर्ग करण्यासाठी 15 दिवसांत शासनाकडे मार्गदर्शन मागवून निर्णय घेणे, पदोन्नती आणि टाईमटेबलबाबत केएमटी प्रशासनासोबत बैठक घेवून निर्णय घेणे असे निर्णय झाले.
 
यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम, शारंगधर देशमुख, अर्जुन माने, भुपाल शेटे, विजय सूर्यवंशी, सचिन चव्हाण, इंद्रजित बोंद्रे, सचिन पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर, केएमटी मान्यता प्राप्त संघटनेचे निशिकांत सरनाईक, प्रमोद पाटील, उपायुक्त रविकांत अडसुळ, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टिना गवळी आदी उपस्थित होते.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor