रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 एप्रिल 2017 (12:01 IST)

पुण्यात टिंबर मार्केटला आग, जीवितहानी नाही

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीमध्ये गोदामं आणि घरं आल्यानं प्रचंड नुकसान झालं आहे. या भीषण आगीत 30 ते 40 घरं जळून खाक झाली असल्याची माहिती मिळाली आहे. सुदैवाने या आगीत कुणीही जखमी झालंलं नाही. तसंच जीवितहानीही झाली नाही.
 
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झाले होते. 15 गाड्या आणि चार वॉटर टँकरच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. सध्या घटनास्थळी कूलिंग ऑपरेशन सुरु आहे. आगीच घरं आणि गोदामांचं प्रचंड नुकसान झालं असलं तरी सुदैवाने यात कुणीही जखमी झालं नाही. तसंच जीवितहानी झाली नाही.