शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 10 एप्रिल 2024 (15:02 IST)

महाराष्ट्रामध्ये एक मांजर वाचवण्याच्या प्रयत्नात पाच लोकांचा मृत्यू

cat
महाराष्ट्रात एक मांजर वाचवण्याच्या प्रयत्नात पाच लोकांचा मृत्यू झाला असून ही घटना अहमदनगर मध्ये झाली असे सांगण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा मध्ये बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये एक मांजर पडली होती. गावकर्यांनी दिलेल्या माहिती अनुसार मांजरीला वाचवायला गेलेला माणूस वरती परत आला नाही म्हणून त्याला वाचवण्यासाठी दुसरे लोक गड्यामध्ये उतरले. या प्रकारे सहा लोक बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये अडकले. मोठया प्रयत्नांनी एक ते दोन जणांना वाचवण्यात यश आले पण इतर लोकांचा मृत्यू झाला. 
 
सांगितले जाते आहे की, या बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये हे लोक अडकले त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पोलीस आणि तहशीलदार वेळेवर पोहचले व कार्यवाही करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना काल घडली. तसेच संध्याकाळ पर्यंत लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. एक अधिकारीने सांगितले की, ही घटना नेवासा तालुक्यातील वाकडी या गावात घडली. एक मांजर खड्ड्यात पडली आणि तिला वाचवायला एक माणूस उतरला पण तो देखील चिखलात अडकला. 
 
नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव म्हणालेत की, त्या माणसाला वाचवण्यासाठी इतर पाच लोक त्यामध्ये उतरलेत आणि आतमध्ये अडकलीत. तसेच सक्शन पंपांसोबत एक बचाव दल वेळेवर पोहचला आणि एका व्यक्तीला वाचवण्यात यश आले. 

Edited By- Dhanashri Naik