बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 (07:54 IST)

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेसला रामराम ठोकणार

ashok chouhan
नवीन सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेसोबतच इतरही पक्षांमधील नेतेमंडळी या युतीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमधील नेत्यांची नावं घेतली जात आहेत. यात सर्वाधिक चर्चा ही काँग्रेसचे नांदेडमधील मोठे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेसला रामराम ठोकणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यासंदर्भात आज माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री माणिकराव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
 
‘ती’ भेट झाली की नाही?
काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त भेट झाल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू झाली होती. या भेटीसंदर्भातील वृत्त दोन्ही नेत्यांनी फेटाळून लावलं असून अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, तरीदेखील या दोघांची भेट झाली असून त्यात अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशावर चर्चा झाल्याचे दावे केले जात आहेत.