गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 फेब्रुवारी 2023 (11:44 IST)

कंटेनरला धडकली कार, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे भरधाव कार कंटेनरवर आदळल्याने एकाच कुटूंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अहमदनगर-पुणे मार्गावर शिरुर येथे एक भीषण अपघातात  एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात चालक जखमी असून त्यांना रुगण्लायात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व डोमरी गावातील असल्याचे समोर येत आहे.
 
सुदाम शंकर भोंडवे (वय ६६), सिंधुताई सुदाम भोंडवे (वय ६०), कार्तिकी अश्विन भोंडवे (वय ३२)  व आनंदी अश्विन भोंडवे (वय ४ वर्षे) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. तर या अपघातात अश्विन सुदाम भोंडवे (वय ३५) गाडी चालवत होते ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कारेगाव मधील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या पत्नी, मुलगी व आई-वडिलांचा या अपघातात मृत्यू झाला.