1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 जानेवारी 2023 (21:33 IST)

चित्रा वाघ यांच्या निशाण्यावर गौतमी पाटील..?

BJP leader Chitra Wagh held a press conference in Osmanabad today
भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेदचा वाद सुरु असताना आता चित्रा वाघ यांच्या निशाण्यावर गौतमी पाटील देखील येणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण आपण गौतमीचे व्हिडीओ पाहून घेणार असल्याची प्रतिक्रिया चित्र वाघ यांनी दिली आहे. चित्रा वाघ यांनी  उस्मानाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या.
 
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज उस्मानाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन तिच्यावर टीका केली. अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही निशाणा साधला. दरम्यान त्यांना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्या “गौतमी पाटील कोण आहे हे माहित नाही. तिचे व्हिडिओ मागवून पाहून घेते”, असे म्हणाल्या.
 
‘व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर डोळ्यावर झापडं लावून आपण सर्व सहन करायचं? आम्ही विरोध केला नाही, तर उद्या तुमच्या चौकामध्ये असे नागडे नाच यायला वेळ लागणार नाही”, असं चित्रा वाघ उर्फिच्या ड्रेसिंग वर बोलताना म्हणाल्या. यावेळी चित्रा वाघ यांना डान्सर गौतमी पाटील हिच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.
 
उर्फिवर टीका करत “इथे धर्माचा विषय नाही. कशाला वेगळी वळण लावताय. हे नागडे नाच आपल्याला मान्य आहेत का? घरातल्या लेकीबाळींसमोर आपण हे आदर्श ठेवणार आहोत?”, असे प्रश्न वाघ यांनी उपस्थित केले. तर “अरे तुम्ही चार भींतींच्या आता काय करता हा तुमचा प्रश्न आहे. पण सार्वजनिकरित्या हे नागडे नाच करत असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही. ही भूमिका आमची कालही होती, आजही आहे आणि उद्यासुद्धा राहील”, असं उत्तर चित्रा वाघ यांनी दिले.
 
Edited By -Ratnadeep Ranshoor