सोमवार, 30 जानेवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (18:23 IST)

राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चे संकेत गिरीश महाजन यांनी दिले

girish mahajan
राज्यात शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्री मंडळात 18 मंत्र्यांनी शपथविधी घेऊन मंत्रिमंडळ पार पाडला. या मंत्रिमंडळात एकाच मंत्र्याकडे अनेक खाते आहेत. तर अनेक आमदार मंत्रिपद मिळण्याची वाट पाहत आहे. आता मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार कधी होणार यावर सर्वांचे लक्ष लागले असून राज्याच्या दुसऱ्या मंत्री मंडळाचा विस्तार कधी होणार या वर भाष्य करताना मंत्री गिरीश महाजन यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार दिवाळीनंतर होण्याचे म्हटले आहे. वरिष्ठ यावर निर्णय घेत मंत्रिमंडळाचा विस्तार करतील. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार 18 मंत्र्यांचा शपथविधी होऊन पार पडला. मंत्रिमंडळाचा विस्तार शिंदे सरकारच्या शपथविधी नंतर सव्वा महिनानंतर झाला. आता मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार दिवाळी नंतर होण्याचे संकेत मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. 
 
 Edited By- Priya Dixit