मंगळवार, 17 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 डिसेंबर 2024 (16:43 IST)

ठाण्यात आई रागावली म्हणून घराबाहेर पडलेली मुलगी मृतावस्थेत आढळली

death
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात आईने मुलीला रागावले या वरून 15 वर्षाची अल्पवयीन मुलगी घराबाहेर पडली आणि 9 दिवसांनंतर मुलीचे मृतदेह नाल्यात आढळले.पोलिसांनी ही माहिती दिली. 
 
सदर घटना   या महिन्याच्या सुरुवातीची आहे. डोंबिवलीत राहणारी मुलगी सतत मोबाईलचा वापर करण्याच्या कारणावरून आईने मुलीला रागावले. परिणामी मुलगी रागावून घराच्या बाहेर पडली. तिचे मृतदेह 9 दिवसांनंतर एका नाल्यात आढळले.

सदर घटना 5 डिसेंबरची आहे. मुलीला सतत मोबाइलचा वापर केल्याने आईने तिला रागावल्यावर तिने घर सोडले नंतर कुटुंबीयांनी तिचा शोध घेतल्यावर देखील ती सापडली नाही म्हणून पोलिसांत बेपत्ता होण्याची तक्रार दिली. 
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना पाच डिसेंबर रोजी डोंबिवलीच्या मोटागाव पुलावरून खाडीत उडी मारल्याची माहिती मिळाली होती. शनिवारी दुपारी नाल्यात मुलीचा मृतदेह आढळला. कुटुंबीयांनी तिची ओळख पटवली. 
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. मुलीच्या मृत्यूची अकस्मात नोंद केली असून मुलीच्या मृत्यूचा अधिक तपास पोलीस लावत आहे. 
Edited By - Priya Dixit