रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 ऑक्टोबर 2023 (10:35 IST)

Gram Panchayat Election: ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

voting
Gram Panchayat Election: ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने काल  2359 ग्रामपंचायतींची, तर 3080 ग्रामपंचायतच्या सरपंच व सदस्यपदाच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 17 जानेवारी 2023 आदेशान्वये राज्यातील जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नवनिर्मित व 2022 मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम देण्यात आला आहे.
  
निवडणूक कार्यक्रम असा असेल  
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, 6 ऑक्टोबरला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे, 16 ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 ते 3 या वेळेत अर्ज दाखल करणे, 23 ऑक्टोबरला दाखल अर्जाची छाननी तर 25 ऑक्टोबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असणार आहे. आवश्यकता भासल्यास निवडणूक 5 नोव्हेंबरला घेण्यात येणार असून, 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
 
मंगळवेढ्यातील 27 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार
मंगळवेढा तालुक्यातील 27 ग्रामपंचायती व एका ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे यंदा ऐन दिवाळीत मंगळवेढ्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.