मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2024 (09:36 IST)

हरभऱ्याचा भाव 400 रुपयांनी वाढला ; आता ‘इतका’ मिळतोय भाव

gram
सध्या  हरभऱ्यासह तुरीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसे आनंदाचे वातावरण आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यात ५,८०० रुपयांवर असलेले हरभऱ्याचे भावाने ६ हजार रुपयाचा टप्पा ओलांडला आहे.
 
बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक वाढली आहे. दररोज बाजार समितीत ८०० क्विंटल हरभऱ्याची आवक होत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव यांनी दिली. आठवडाभरातच हरभऱ्याच्या भावात ३०० ते ४०० रुपयांची वाढ झाली आहे. बाजार समितीमध्ये हरभऱ्याचा दर ६,१०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजेच हमीभावापेक्षाही हरभऱ्याला ६०० ते ७०० रुपयापर्यंतचा अधिकचा भाव मिळत आहे. तुरीला देखील हमीभावापेक्षा अधिकचा भाव मिळतोय. त्यामुळे बाजार समितीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
 
जळगाव बाजार समितीत रब्बी हंगामातील धान्य खरेदीच्या पहिल्याच दिवशी हरभऱ्याला ५,८०० रुपयांचा भाव मिळाला होता. सध्या बाजार समितीमध्ये तुरीची आवकदेखील कायम असून, तुरीचे दर १० हजार रुपयांवर स्थिर आहेत. हरभऱ्याला मागणी कायम असल्याने आगामी काही दिवसांत हरभऱ्याचे दर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor