सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 31 ऑगस्ट 2022 (09:17 IST)

खोके कुठे जातात आणि कोण-कोठे गद्दारी करतो हेही मला माहीत आहे.- एकनाथ शिंदे

eknath shinde
"माझ्याकडे सगळा हिशोब आहे, बोलायला भाग पाडू नका", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता म्हटलं आहे.
 
"बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा कोणी केली? हिंदुत्वाच्या विचारांशी बेईमानी कोणी केली? बाळासाहेबांचा आणि नरेंद्र मोदींचा फोटो लावून ज्या लोकांसोबत आपण निवडून आलो, त्यांच्या विचारांशी प्रतारणा कोणी केली? आपल्याला मत देणाऱ्या मतदारांशी बेईमानी कोणी केली? हे सर्व आम्ही बोलू शकतो. सध्या मी सज्जन भाषेत बोलत आहे. पण यावर मी नक्की बोलणार आहे", असं शिंदे म्हणाले.

"खोके कुठे जातात? आणि कोण-कोठे गद्दारी करतो? हेही मला माहीत आहे. माझ्याकडे सगळा हिशोब आहे. पण मला काम करायचं आहे. मला कामाने उत्तर द्यायचं आहे. त्यामुळे मी जास्त बोलत नाही. त्यांनीही मला बोलायला भाग पाडू नये, एवढीच माझी इच्छा आहे" असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.