रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (17:33 IST)

एक जरी आरोप खरा ठरला तर आमदारकिचा राजीनामा देईन-हसन मुश्रीफ

hasan mushrif
किरीट सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला तर आमदारकिचा राजीनामा देईन असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. कोल्हापूर मध्यवर्ती बँकेच्य़ा कर्मचाऱ्यांची केंद्रिय तपास यंत्रणा ईडीकडून चौकशी झाली त्यानंतर त्यांची ही प्रतिक्रिया आली आहे.
 
कोल्हापूरात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून माझ्या बदनामीचे षडयंत्र सुरु आहे. किरीट सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन. किरिट सोमय्या यांच्या मागे असलेले बोलवते धनी कोण आहे हे लवकरच लोकांसमोर आणू.” असा त्यांनी आरोप केला.
 
पुढे बोलताना ते म्हणाले, “एक पैशाचे कर्ज मी घेतले नाही, किंवा माझ्या नातेवाईकांना सुद्धा कर्ज दिलं नाही. मी आमदार विनय कोरे आणि शिंदे गटाचे बँकेचे संचालक यांना किरीट सोमय्या यांच्याकडे पाठवणार आहे. केवळ आरोपापोटी छापे टाकण्याचा हा उपक्रम जागतिक रेकॉर्ड होईल.” असे म्हणून शेतकऱ्यांच्या मालकीच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बदनाम करण्याचे पाप करू नका असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले.