1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 24 मे 2022 (09:25 IST)

कधी एअरपोर्टवर भेटले तर हिसका दाखवेन- बृजभूषण सिंह

राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा 'तूर्तास' स्थगित केला असला तरी भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी आपली तलवार अजून पूर्ण म्यान केलेली नाही. गेली आठ वर्षं मी राज ठाकरे यांना शोधतोय, ते कधी विमानतळावर भेटले तर दाखवेन हिसका असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
 
बृजभूषण सिंह म्हणाले, "राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीयंविरोधात केलेल्या आंदोलनाबद्दल, मारहाणीबद्दल माफी मागत नाहीत तोपर्यंत अयोध्येत पाय ठेवू देणार नाही. आम्ही रामाचे वंशज आहोत, त्यांनी रामाच्या वंशजांचा अपमान केला आहे."राज ठाकरे उत्तर भारतात कोणत्याही राज्यात गेले तरी त्यांना विरोध करण्यात येईल असेही बृजभूषण यांनी सांगितले.