मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 मार्च 2022 (15:37 IST)

लढाई संपली नाही तर आता खरी लढाई मुंबईत होणार आहे : फडणवीस

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सत्तेत आणल्यानंतर मुंबई भाजप कार्यालयात त्यांचे  जंगी स्वागत करण्यात आले आहे. गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवून मतदारांनी मत दिलं आहे. गोव्यात भाजपची एकहाती सत्ता आली परंतु हा विजय साजरा केल्यानंतर आता मुंबईसाठी सज्ज व्हायचे आहे. लढाई संपली नाही तर आता खरी लढाई मुंबईत होणार आहे. असा इशारा फडणवीसांनी शिवसेनेला दिला आहे. यावेळी फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. 
 
कुठल्याच लढाईने होरपळून जायचे नाही. कुठलाही विजय डोक्यात घालायचा नाही. विजयाने नम्र व्हायचे विजयाने अधिक मेहनत करायची. खरी लढाई आता मुंबईत व्हायची आहे. मुंबईला कुठल्या पार्टीपासून मुक्त करायचे नाही तर मुंबईला भ्रष्टाचारातून मुक्त करायचे आहे. आम्ही कुठल्या पार्टीच्या विरोधात नाही तर आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. त्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहे. जोपर्यंत मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढत नाही. तोपर्यंत दम घेता येणार नाही. म्हणून हा विजय आज साजरा करा आणि उद्यापासून कामाला लागा आणि पुन्हा एकदा मुंबईचा प्रचंड विजय या महाराष्ट्रामध्ये भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार तयार करण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज राहावे ही आपल्या सर्वांना विनंती करतो.