शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (15:49 IST)

औरंगाबादमध्ये सभा घ्यायची असेल तर…; पोलिसांनी दिल्या मनसेला सूचना

maharashatra navnirman sena
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलच तापलं आहे.

या सभेची सुरुवात मनसैनिकांनी करायला सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद पोलिसांनी (राज ठाकरेंच्या या नियोजित सभेची तारीख बदलण्याच्या सूचना मनसेला दिल्या आहेत. रमझान ईदनंतर म्हणजेच ३ मे नंतर राज यांनी सभा घ्यावी असं सांगितले आहे.कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असा पोलिसांचा प्रयत्न आहे.