शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (13:40 IST)

मुलीच्या लग्नाच्या एक दिवस आधी पित्याचा मृत्यू

death
औरंगाबाद- धम्मरत्न मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि बायजीपुरा येथील अमर हायस्कूलचे प्राथमिक शिक्षक दिलीप रगडे यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा संकेत, मुलगी कोमल असा कुटुंब आहे.
 
22 एप्रिल रोजी दिलीप रगडे यांची कन्या कोमल हिचा विवाह हर्सूल सावंगी येथील मंगल कार्यालयात होणार होता. मुलीच्या लग्नाच्या पत्रिका स्वतः रगडे यांनी वाटल्या होत्या तसेच पूर्ण तयारी केली होती. त्यांनी बुधवारी रात्री झालेल्या हळदीच्या कार्यक्रमा देखील आनंदाने सहभाग घेतला होता. सकाळीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
 
धम्मरत्न मित्र मंडळाच्या वतीने महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीचे कार्यक्रम टीव्ही सेंटरवर ते आयोजित करीत होते. मुलीचा विवाह एक दिवसावर आलेला असताना पित्याचा असा अंत झाल्याने परिसरात  शोक पसरला आहे.