रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (22:43 IST)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

anil deshmukh
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. विशेष पीएमएलए न्यायालयात  अनिल देशमुख यांना हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी अनिल देशमुख यांना 13 सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
अनिल देशमुख चक्कर येऊन तुरूंगात पडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी देशमुख चक्कर आल्याने तुरूंगात पडले होते. त्यामुळे जे. जे. रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर संध्याकाळीच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.