बुधवार, 25 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 मार्च 2017 (16:52 IST)

देशातील पहिले पेपरलेस सभागृह होण्याचा मान महाराष्ट्र विधान परिषदेला

देशातील पहिले कागदविरहित (पेपरलेस) सभागृह होण्याचा मान महाराष्ट्र विधान परिषदेला मिळाला. विधान परिषदेतील सर्व आमदारांना टचस्क्रीन टॅब देण्यात आले असून सभागृहाशी संबंधित सर्व कामकाज आता या टॅबच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या टॅबमध्ये १९३७ पासून ते २0१६ पर्यंतची विधान परिषदेबाबतची सर्व माहिती देण्यात आली असून रोजचे ठराव, तारांकित व अतारांकित प्रश्नांच्या याद्या, लक्षवेधी सूचना, सदस्यांनी  घेतलेल्या सोयीसुविधा, महामंडळाचे अहवाल, विधान मंडळ समित्यांचे अहवाल अशा प्रकारची सर्व माहिती यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती दिली आहे.