रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जुलै 2021 (17:17 IST)

सरकार झोपलंय का? : अमित ठाकरे

मनसे नेते अमित ठाकरे यांनी आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी स्वप्नीलच्या आई वडिलांना दोन लाखांचा चेक देत अमित ठाकरे यांनी माझा मोबाईल नंबर देऊन जातो कधीही काही वाटलं आणि काही मदत लागली तर फोन करा. आमचा संपूर्ण पक्ष तुमच्याशी पाठीशी आहे असं आश्वासन दिलं. त्यांनंतर माध्यमांशी बोलतांना सरकार झोपलंय का? हे विचारलं पाहिजे लवकर भरती करा अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली आहे. 
 
दुसरीकडे अशा भेटू देऊन आमचा प्रश्न सुटणार नाही भरती लवकर करा आणि विद्यार्थ्यांना नोकरी लागू द्या हीच आमच्या स्वप्नीलसाठी श्रद्धांजली आहे अशी प्रतिक्रिया स्वप्नीलच्या आईवडिलांनी दिली आहे. सरकार कशाची वाट बघतय? सरकार झोपलंय का हे विचारलं पाहिजे? आमच्या पद्धतीने आम्ही मदत करतोय, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिलं आहे.