रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 ऑगस्ट 2023 (19:48 IST)

Kalva :कळवाच्या रुग्णालयात एका महिन्याच्या बाळासह चौघांचा मृत्यू

ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरुवार 10 ऑगस्ट रोजी 5 रुग्णांचा मृत्यू झाला नंतर रविवारी 13 ऑगस्ट रोजी 18 रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आता या रुग्णालयात मृत्यूचे सत्र सुरु असून आज 14 ऑगस्ट रोजी पुन्हा चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्युमुखी झालेल्या रुग्णांमध्ये एका महिन्याच्या मुलाचा समावेश आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. 
 
सध्या पावसाळा सुरु आहे. या काळात मलेरिया आणि डेंग्यू साथीचे रोग पसरले असून कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात या साथीच्या रोगांच्या रुग्णांवर उपचार सुरु आहे. रुग्णांची संख्या वाढत असून बेड्सची अतिरिक्त संख्या वाढली असून जोशींचे बेड्स लावले जात आहे. पण गेल्या 4 दिवसांपासून रुग्णालयातील 27 रुग्णांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या मृत्यूंमुळे रुग्णालयाच्या प्रशासनाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उदभवत आहे. 
 
रुग्णालय प्रशासनाने रुग्णांच्या मृत्यूची कारणे सांगितली असून त्यांनी सांगितले की,जे रुग्ण दगावले आहे ते रुग्ण वेग  वेगळ्या व्याधींनी ग्रस्त होते.काही रुग्ण अल्सर, यकृत व्याधी, डोक्याला मारहाण, ऑक्सिजनची कमतरता, लघवी संसर्ग, रक्तदाब कमी होणे, निमोनिया, ताप, विषप्राशन अशा त्रासाने ग्रस्त होते. आणि त्यांचा मृत्यू या कारणास्तव झाला. या रुग्णालयात ठाणे, कळवा, पालघर, मुंब्रा, उल्हासनगर, वाडा, भिवंडी, डोंबिवली, जव्हार, दिवा, या भागातून रुग्ण येतात. दगावलेल्या रुग्णांमध्ये 33 ते 83 व्यायोगटातील आणि एक महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. 
 
Edited by - Priya Dixit