गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 सप्टेंबर 2017 (11:23 IST)

लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न

तब्बल 22 तासांच्या वैभवशाली मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आलं आहे. भक्तिमय वातावरणात आणि 22 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाला भक्त भावपूर्ण निरोप देण्यात आला. मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास लालबागच्या राजाची मिरवणूक सुरु झाली होती. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी मुंबईकरांनी नेहमीप्रमाणे तुफान गर्दी केली होती. आपल्या लाडक्या गणपतीला निरोप देताना अनेकांच्या भावना अनावर झाल्या होत्या. बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास लालबागच्या राजाचं  गिरगाव चौपाटीवर आगमन झालं होतं. यानंतर दोन तासांनी म्हणजेच आठ वाजण्याच्या सुमारास लालबागच्या राजाचं अरबी समुद्रात विसर्जन करण्यात आलं.