बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जुलै 2019 (09:28 IST)

पोलिस दलातील ९७ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना बढती देवून बदली तर ८ सहाय्यक पोलिस आयुक्‍तांच्या बदल्यांचे आदेश

राज्य गृह विभागाने पोलिस दलातील तब्बल ९७ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना बढती देवून बदली केली. दरम्यान, आजच ८ सहाय्यक पोलिस आयुक्‍तांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. बदली झालेल्या सहाय्यक आयुक्‍तांचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे आहे.अनिल निवृत्‍ती कदम (नियुक्‍तीच्या प्रतिक्षेत ते उपविभागीय अधिकारी, शाहुवाडी उपविभाग, कोल्हापूर), संदीप रघुनाथ गावित (नियुक्‍तीच्या प्रतिक्षेत ते उपविभागीय अधिकारी, गंगापूर उपविभाग, औरंगाबाद ग्रामीण), अर्जुन नरसिंग भोसले (नियुक्‍तीच्या प्रतिक्षेत ते उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूर उपविभाग, अकोला), अशोक रमेश थोरात (नियुक्‍तीच्या प्रतिक्षेत ते उपविभागीय अधिकारी, पाटण उपविभाग, सातारा), अरूण जगताप (उप अधीक्षक ; मुख्यालय, नागपूर, बदली आदेशाधीन ते अप्पर अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), प्रितम विकास यावलकर (उपविभागीय अधिकारी, कन्‍नड उपविभाग, औरंगाबाद ग्रामीण, बदली आदेशाधीन ते उप अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, पुणे), जयराम दत्‍तात्रय मोरे (सहाय्यक आयुक्‍त, मुंबई शहर ते सहाय्यक आयुक्‍त, ठाणे शहर).