शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 जुलै 2024 (11:30 IST)

महाराष्ट्र: नागपुर रेल्वे स्टेशनवर महिलेने केली लहान मुलाची चोरी, पोलिसांनी 24 तासांच्या आत शोधून काढले

महाराष्टातील नागपूरमध्ये रेल्वे स्टेशनवर एक महिला व्दारा लहान मुलाची चोरी प्रकरण समोर आले आहे. ही घटना सीसीसीटी मध्ये कैद झाल्याने या आधारावर पोलिसांनी एवढ्या 24 तासाच्या आत या प्रकरणाचा छडा लावला आहे. नागपूरमध्ये रेल्वे स्टेशनवर लहान मुलांची चोरी करणे हे प्रकरणे खूप वाढली आहे.
 
काय आहे संपूर्ण प्रकरण?
नागपूरमध्ये रेल्वे स्टेशनवर एक महिला व्दारा लहान मुलाची चोरी प्रकरण समोर आले आहे.पोलिसांना त्या लहान मुलाच्या पालकांकडून एफआईआर मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. सीसीटीवी फुटेज आधार वर पोलीस या आरोपी महिलेपर्यंत पोहचले व तिला अटक केली. ही गोष्ट धक्कादायक आहे कारण एका महिन्यात ही अपहरणाची दुसरी घटना घडली आहे.
 
या महिलेला पकडण्यासाठी जीआरपी नागपुर ने 4 टीम बनवल्या होत्या आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी चारही दिशेला पाठवले होते. पोलीसांच्या एका टीम ने या महिलेला अमरावती मधून ताब्यात घेतले आणि तिच्या जवळील लहान मुलाला त्याच्या पालकांकडे सुपूर्त केले आहे .