बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (08:55 IST)

राज्यातले निवासी डॉक्टर्स संपावर, विविध मागण्यांसाठी MARDचं आंदोलन

राज्यभरातले निवासी डॉक्टर्स आज सकाळी 8 वाजल्यापासून बेमुदत संपावर गेले आहेत. मार्ड संघटनेला देण्यात आलेल्या विविध आश्वासनांची पूर्तता करण्यात न आल्याने निवासी डॉक्टरांच्या या संघटनेनं संप पुकारला आहे.
 
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांची शैक्षणिक फी माफी, प्रोत्साहन भत्ता, पालिका महाविद्यालयाच्या डॉक्टर्सच्या टीडीएसचा मुद्दा आणि राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या हॉस्टेलमधल्या समस्या सोडवाव्यात या सगळ्या निवासी डॉक्टर्सच्या मागण्या आहेत.
 
कोरोना काळात निवासी डॉक्टर्सनी केलेली रुग्णसेवा आणि यादरम्यान त्यांचं झालेलं शैक्षणिक नुकसान, हे पाहता या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी फी माफीचं आश्वासन दिलं होतं.राज्यातले 5 हजारांपेक्षा जास्त निवासी डॉक्टर्स या संपामध्ये सहभागी होत आहे