रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जुलै 2017 (16:46 IST)

मासे फेकून नितेश राणे यांनी विचारला जाब

काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी  मच्छिमारांच्या विविध प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी गेले असता सहाय्यक मत्स्य आयुक्तांवर थेट मासे फेकले आहेत. ते मालवणमध्ये  मच्छिमारांच्या प्रश्नांबाबत जाब विचारण्यासाठी सहाय्यक मत्स्य आयुक्त जिल्हा कार्यालय भेट दिली. यावेळी राणे यांच्यासोबत आलेल्या मच्छिमारांनी थेट आयुक्तांच्या टेबलवर माशांची टोपली ओतली. यावेळी आयुक्तांसोबत चर्चा सुरु असताना, त्यांनी योग्य उत्तरं न दिल्याने चिडलेल्या नितेश राणे यांनी थेट त्यांच्या अंगावर मासे फेकले.