1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (14:40 IST)

मुन्नाभाईचं काळीज कळायला मामूला अजून सात जन्म घ्यावे लागतील

उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा पुन्हा एकदा ‘मुन्नाभाई’ असा उल्लेख करत खोचक शब्दांत टोला लगावला होता. त्यावरून आता मनसेनं प्रत्युत्तर दिलं असून उद्धव ठाकरेंना थेट ‘मामू’ अर्थात या चित्रपटातील बोमन इराणी यांच्या पात्राची उपमा दिली आहे.
 
उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी खोचक ट्वीट केलं आहे. “आदित्य ठाकरेंसाठी वरळीत मनसेचा उमेदवार न देता राज ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवला. २०१२ ला एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ठाणे मनपात सेनेच्या महापौर पदासाठी मनसेच्या ७ नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा दिला”, अशी आठवण गजानन काळेंनी उद्धव ठाकरेंना करून दिली आहे.
 
“मुन्नाभाईचं काळीज कळायला मामूला अजून सात जन्म घ्यावे लागतील. गेट वेल सून मामू”, असं या ट्वीटमध्ये शेवटी गजानन काळेंनी म्हटल आहे.